Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता!

राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता!

235
Adv

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी उन्हाचा कडाका, तर ढगाळ वातावरण होत आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन दिवसांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा 11 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील खांदेश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.

Adv