साताऱ्यातील पोवई नाक्यावरील फ्लेक्स बोर्डच्या स्ट्रक्चर मध्ये लोखंडी जाळीचे छत करून अतिक्रमणाचाच एक प्रकारे घाट घातला गेला असल्याचे दिसून येते एखादे दुर्घटना झाल्यावर फ्लेक्सचा चाणक्य जबाबदारी घेणार का अशी चर्चा साताऱ्यात रंगते
साताऱ्यात सध्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे तो म्हणजे मोठमोठे लोखंडी फ्लेक्स बोर्ड उभारण्याचे स्ट्रक्चर हे थोडे कमी की काय म्हणून पोवई नाक्यावरील स्ट्रक्चरच्या मधोमध अज्ञात व्यक्तिने लोखंडी चे छत करून अतिक्रमणच केल्याचा प्रकार उघडकीस येतोय
सातारा पालिका प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी पोवई नाकावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची आहे मोठमोठ्या फ्लेक्स कोसळल्याने जीवितहानी झालेले आपण पाहिले इथं मात्र मोठमोठे फ्लेक्स उभारून एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशीच खेळ होतोय असं दिसतय







