जुना मोटर स्टँड येथील पेट्रोल पंप वाचणारा प्रशासनातील गॉडफादर कोण

443
Adv

सातारा शहरातील जुना मोटर स्टँड परिसरात पालिकेच्या हद्दीत असणारे पेट्रोल पंपाची मुदत केल्या काही वर्षापूर्वीच संपली असून सातारा पालिकेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिनांक दोन्ही पेट्रोल पंप चालकांना 3,5, 2021 रोजी पेट्रोल पंपाची जागा ताब्यात देण्यात यावी यासाठी नोटीस धाडली होती यावर पुढे प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई न झाल्याने पेट्रोल पंप चालकांना वाचणारा प्रशासनातला गॉड फादर कोण हा खरा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे

सातारा पालिकेची मिळकत असलेल्या जुना मोटर स्टँड परिसरात पालिकेच्या जागेत दोन पेट्रोल पंप गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू आहेत या पेट्रोल पंपाची मुदत गेल्या दहा वर्षांपूर्वीच संपली असून संबंधित पेट्रोल चालकांनी कोणतीही भाडेपट्टी भरली नसून सदरचे पेट्रोल पंप हे अतिक्रमण असून या पेट्रोल पंप चालकांना पालिकेतीलच कोणतरी गॉडफादर भेटल्याने हे पेट्रोल पंप चालक बिनधास्त वावरत आहेत सर्व सामान्य नागरिकांनी रस्त्यावर टपरी टाकली तरी त्याची टपरी उचलली जाते मात्र दहा वर्ष सातारकरांची व पालिका प्रशासना ची दिशाभूल करून दोन्ही पेट्रोलपंप चालकांनी कोट्यावधी रुपये माया जमवुन पालिकेची व शहराची फसवणूक केली असून या पेट्रोल पंप चालकांवर मुख्याधिकारी आता कोणता ठोस निर्णय घेतायत याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे

मुख्याधिकारी साहेब पेट्रोल पंपावर कारवाई करा

मुख्याधिकारी साहेब आपण कर्तव्यदक्ष असल्याचा अनुभव संपूर्ण सातारकरांना आहे त्यामुळे या पेट्रोल पंप चालकांना अभय न देता आपणच आपल्या सहीने तयार केलेल्या नोटसी नुसार संबंधित पेट्रोल पंप चालकांची जागाही ताब्यात घेऊन संबंधितां वर योग्य ती कारवाई करून वर्षानुवर्षे अतिक्रमण करून सातारकरांची चाललेली फसवणूक थांबवावी व पेट्रोल पंप चालकांना तेथून हद्दपार करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे

Adv