Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City १४ बालकांना मिळाले मंत्री महोदय यांच्यामुळे नवजीवन

१४ बालकांना मिळाले मंत्री महोदय यांच्यामुळे नवजीवन

215
Adv

गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांसाठी वैद्यकीय उपचार घेणे म्हणजे मोठे संकटच. विशेषतः जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांच्या कुटुंबांसाठी ही समस्या आणखीच गंभीर ठरते. एका अहवालानुसार आपल्या देशात साधारणतः ३% कुटुंब महागड्या आरोग्य खर्चामुळे दारिद्र्यरेषेखाली ढकलले जात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. मात्र, सातारा जिल्ह्यास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्यारूपाने लाभलेल्या संवेदनशील नेत्यामुळे १४ निष्पाप बालकांना नवजीवन मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या पुढाकाराने आणि श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॅार चाईल्ड हार्ट केअर, खारघर, नवी मुंबई येथील निष्णात ह्रदय रोग तज्ञांच्या मदतीने १४ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आणि ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकाराने साताऱ्यात अनोखी आरोग्य गुढी उभारण्यात आली!

संवेदनशीलतेतून पुढाकार –
विलासपूर (सातारा) येथे राहणाऱ्या रोहित चव्हाण यांच्या चार महिन्यांच्या मुलीला हृदयविकार असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मात्र मोलमजुरी करून तुटपुंज्या मिळकतीवर कुटूंबाची कशीबशी गुजराण करणाऱ्या चव्हाण यांना लहानग्या मुलीच्या उपचारांसाठीचा येणारा लाखो रुपयांचा खर्च परवडणारा नव्हता. ही बाब मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कानावर फिरोज पठाण यांच्या मार्फत घातली गेली आणि त्यांनी त्वरित मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून (रूपये १ लाख) मदत उपलब्ध करून दिली. मानवतेच्या दृष्टीकोनातून एस.आर.सी.सी. चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबई यांच्या प्रशासनाशी समन्वय साधला आणि रूग्णालय प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळेच रूग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांकडून तिच्यावर मोफत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. ती लहानगी आता आरोग्यदृष्टया सुरक्षित असून, मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या सहृदयतेने भारावलेले चव्हाण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.

Adv