Friday, April 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City किल्ले अजिंक्यतारा येथील गटाराचे काम निकृष्ट प्रकरणी पंचायत समितीने हात झटकले ते...

किल्ले अजिंक्यतारा येथील गटाराचे काम निकृष्ट प्रकरणी पंचायत समितीने हात झटकले ते काम आमचे नव्हेच केले स्पष्ट

383
Adv

मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा येथील गटाराच्या निकृष्ट कामा प्रकरणी अधिक माहिती घेतली असता सदरील काम हे आमच्या कडे नसल्याचा खुलासा पंचायत समितीचे उच्चअधिकारी श्री खैरमोडे रावसाहेब यांनी सातारानामाशी बोलताना केला आहे

काही दिवसांपूर्वी शिवसेनेने या कामाचा भांडाफोड केला होता आज समक्ष पाहणी केली असता येथील कामनिकृष्ट असल्याचे दिसून आले गेल्या वर्षी हद्दवाढ झाली असून ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला हा सातारा पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे तत्पूर्वी या किल्ल्याच्या देखभालीसाठी पंचायत समिती मधून निधी उपलब्ध झाला होता मात्र निधी उपलब्ध होताना फक्त रस्त्याच्या डांबरीकरण यासाठी निधी उपलब्ध झाला होता त्यामध्ये गटार बांधणी याचा उल्लेखच केला नसून नक्की गटाराचे काम करते कोण याचा जावईशोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे

पंचायत समितीचे अधिकारी श्री खैरमोडे यांनी सांगितले की आम्ही सदरील रस्ता हा सातारा पालिकेकडे वर्ग करण्यासाठी प्रस्ताव ठेवला असून तो लवकरच वर्ग होईल तत्पूर्वी हे काम कोण करते याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे

आत्ता सध्याच्या घडीला किल्ले अजिंक्यतारा येथील रस्ता हा पंचायत समितीच्या हद्दीत असून याची सर्वस्व जबाबदारी ही पंचायत समितीची आहे त्यांच्या हद्दीत चाललेल्या कामाची माहिती जर पंचायत समिती नसेल तर तालुक्याचा कारभार कोणाच्या भरोशावर चाललाय हा प्रश्न निर्माण होत आहे

Adv