Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City फार्म हाऊस धारक व हॉटेल व्यवसायिकांची धाबे दणाणले

फार्म हाऊस धारक व हॉटेल व्यवसायिकांची धाबे दणाणले

1162
Adv

यवतेश्वर कास रस्त्यावरील बांधकामांचे अतिक्रमण केलेल्या भूखंड धारकांना तसेच हॉटेल व्यवसायिकांना महसूल विभागाने नोटीस बजावल्या आहेत तहसीलदार नागेश गायकवाड यांनीही कारवाई केली असून संबंधितांना 30 दिवसाच्या आत अतिक्रमित बांधकाम काढून घेण्याचा इशारा देण्यात आला आहे या कारवाईमुळे सातारा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे

सातारा आणि जावळी तालुक्याच्या हद्दीवरील कास पठार परिसर हा नैसर्गिक दृष्ट्या संवेदनशील मानला जातो.कास पठार येथे पावसाळ्यानंतर फुलणारा फुलांचा हंगाम लक्षात घेऊन येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. याचा फायदा घेऊन बाहेरील बडया हस्तींनी कवडी मोलाने जमिनी विकत घेऊन येथे मोठी बांधकामे केली आहेत . ही बांधकामे करताना महसूल विभागाच्या आणि वनविभागाच्या पर्यावरण नियमाचे सर्रास उल्लंघन झालेले आहे . दरवर्षी येथील बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर येतो . जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुद्धा या संदर्भामध्ये कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत . त्यातच दोन दिवसांपूर्वी महसूल विभागाने यवतेश्वर कास रस्त्यावरील सुमारे 83 भूखंड धारकांना बांधकामाचे अतिक्रमण केल्याच्या निमित्ताने महसूल अधिनियम 53 नुसार नोटीस बजावलेली आहे.

या नोटीस मध्ये म्हणण्यात आलेले आहे की ही नोटीस प्राप्त झाल्यापासून संबंधित सर्वे गट नंबर मध्ये विनापरवाना केलेले बांधकाम 30 दिवसाच्या आत काढून घेण्यात यावे चालू असलेले बांधकाम त्वरित पूर्णपणे बंद करण्यात यावे सदरच्या सर्व बाबीची अथवा इतर कोणत्याही नुकसानी आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास स्वतः भूखंड धारक जबाबदार राहणार आहेत अशा नोटिसा महसूल यंत्रणेने संबंधित मिळकत धारकांना रवाना केल्यामुळे हॉटेल चालकांमध्ये एकच अस्वस्थता निर्माण झाली आहे . लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तोंडावर असताना महसूल विभागाने कास परिसरातल्या अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उभारल्याने यासंदर्भात हॉटेल चालक यांची अडचण झालेली आहे येथील हॉटेल व्यवसायिकांना राजकीय वरदहस्त असल्याची नेहमीच चर्चा असते येथील अतिक्रमणांना अभय मिळणार नसल्याचे महसूल विभागाच्या या कारवाईने स्पष्ट झाले आहे या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली आहे या कारवाईला साताऱ्याचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दुजोरा दिला आहे

Adv