जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोरच मास असोसिएशनची अनधिकृत कमान

127
Adv

मास औद्योगिक प्रदर्शनाचे पालकमंत्री शंभूराजे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले असून मास असोसिएनने चक्क जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निवासस्थाना समोरच बेकायदेशीर कमान उभारली आहे

मास औद्योगिक प्रदर्शनाचे विविध मान्यवरांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले असून सातारा पालिकेची कोणतीही परवानगी न घेता चक्क जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या घरासमोरच कमान उभारल्याने मोठ्यांना एक न्याय व सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय असे चित्र दिसून येत आहे असोशियन मार्फत कोट्यावधीचा रुपये खर्च करून मास औद्योगिक प्रदर्शन सुरू झाले असले तरी सातारा पालिकेला मात्र यांनी कोणतीही फी न भरता मुख्य चौकात कमान उभारली असून सातारा पालिकायावर कारवाई करणार का याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे

प्रशासनाचे प्रमुख असलेले साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निवासस्थानासमोरच जर अशी अनाधिकृत कमान उभी राहत असेल तर जिल्हाधिकारी यांना ही या मास असोसिएशनने अंधारात ठेवले असल्याचे दिसून येते

जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी या प्रकरणी पालिका प्रशासनाला काय आदेश देतात याकडे सर्वसामान्य सातारकर यांचे लक्ष लागले असून यापुढे कोणीही अनाधिकृत भर रस्त्यात कमान उभारत असेल तर कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा सातारकर जनता करत आहे

Adv