छत्रपती शिवाजी महाराजांच्या आभाळाएवढ्या अत्याधुनिक कार्यकर्तृत्वाचे असलेले दडपण आणि “ छत्रपती ” या अस्मानी किताबाचे थेट मानकरी असलेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही “ छत्रपती ” आणि “ शिवाजी महाराज ” यांच्याशी केली जाते. सोशल मीडियामध्ये ट्वीटर, फेसबुक, यु ट्युब, व्हाट्सअप, ई मेल स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु त्या विना देखील प्रत्येक क्षेत्रातील संपूर्ण माहिती स्वत:कडे बाळगून सर्वांत जास्त चर्चेत आणि स्पष्टवक्ते म्हणून असलेले व्यक्तीमत्व म्हणजे उदयनराजे.
शासनाला त्यांच्या एका बाईटने, शब्दाने, विचाराने आणि अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे झालेले रुपांतर शांततेत होते. अशा बुलंद, झुंजार आणि सर्वसामान्य माणसांचा काळीजकप्पा असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त..
कोणताही वाद आणि एक संघर्ष असला तरी त्याचा उपाय उदयनराजेच ठरतात. त्यांच्याकडे सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी निवारणासाठी जातात. तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वत:च नाहीशा होतात. हिंदीमध्ये एक कहावत आहे, “ वो सामने आए तो अजब तमाशा हुआ, हर शिकायतने जैसे खुदखुशी कर ली । ”. खरं म्हणजे त्यांचा आणि माझा संबंध एक कार्यकर्ता म्हणून आला. मी कधी त्यांच्या प्रेमात, मोहात अडकवून गेलो हे मलाच उमगले नाही. भरतगावच्या श्री गणरायाच्या भंडाऱ्यात महाराजांची केलेली तुला आमच्या जवळीकतेचा एक हिस्सा ठरला. शेतकऱ्यांच्या अडचणी, देशाची एकात्मता या संबधाने चर्चा नेहमीच व्हायच्या. 1 फेब्रुवारी 2009 साली भुमाता गौरव दिंडीनं आम्ही अधिक जवळ आलो ते आजअखेर. अतिशय अभ्यासू एकाग्रतेने ऐकून चर्चा करणारे, असे हे व्यक्तीमत्व चर्चेदरम्यान, जैवतंत्रज्ञान- यंत्रमानव प्रिसीजन फार्मिग- जीआयएस, जीपीएस, जगातील नवनवीन शेती तंत्रज्ञान, सिंचनाच्या अत्याधुनिक पध्दती, मूल्यवर्धी व शेतकऱ्याला अस्मानी-सुलतानी संकटापासून सुरक्षा देणारी योजना, यातील प्रत्येक बाबींचा अभ्यास महाराज कधी करतात हे मला न सुटलेलं कोड आहे आणि त्याबाबतच्या टिपण्या स्वतः काढतात त्यावेळी मला आश्चर्य वाटतं.
एखादी गोष्ट महाराजांनी ऐकली की त्यांना पुन्हा सांगावी लागत नाही. सर्वसामान्य जनतेची काम व्हावीत हा त्यांचा अट्टाहास असतो त्यासाठी त्यांचा शासनाला पाठविलेल्या निवेदनाचा पाठपुरावा कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावं. सन 2009 सालापासून, त्यांनी शासनाला केलेल्या पत्रातील मुद्यांवर जर सकारात्मक विचाराने, चौकटी बाहेर विचार करुन, कार्यवाही झाली असती, तर आज सातारा जिल्हा, देशातील एक समृध्द जिल्हा तर झाला असताच, पण भारतातील शेती अनुदानमुक्त झाली असती आणि शेतकर्यांएना कर्जामुळे कधीच आत्महत्या करावी लागली नसती. सरकारने चौकटीबाहेर विचार करण्यास आणि जे सामान्यांच्या भल्याचं आहे ते करण्यासाठी संघर्ष उदयनराजेच करतात. सन 2009 सालच्या भुमाता मोहिमेच्या वेळी भर दुपारी 12.30 वाजता, महामार्गावर झोपण्यापासून ते 31 मे 2017 रोजी साताऱ्यातील भुमातेच्या किसान क्रांती मोर्चाला त्यांनी पूर्ण मदत केली. जनतेचे हित हाच त्यांचा पक्ष. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, कृषीमंत्री, पंतप्रधान, अर्थमंत्री आदी अनेकांबरोबर त्यांच्यासमवेत चर्चा करण्याचा योग आला. अत्यंत विनम्रपणे आणि अभ्यासुपणाने शेतकऱ्यांच्या चर्चा प्रश्नां विषयी ते चर्चा करतात.
शासनाची कृती कमी आणि दुसरं शासन प्रिसीजन म्हणजे आपण योग्य ते सांगितलेलं काम पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज काय असा उदयनराजेंचा स्वभाव.
ते प्रसंगी एकटे चालणे नेहमी उत्तम समजतात. सामान्य व अन्यायपिडीत निराधार रयतेचे दु:ख दूर करणे, हे त्यांच्या स्वभावात भिनले आहे. भारतातला सर्वांत मोठा जमिनीचा मालक, आपल्याला खाण्यासाठी धान्य बाजारातून विकत घेतो आणि जलमंदिरात राहुन, दुष्काळी भागातील सिंचनाचा विचार करतो. कोणत्याही मंत्रीपदाचे चिलखत नसलेला, पण कोणतेही संरक्षण न घेता जनता हेच कवच म्हणून जनतेत काम करणारे व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. वाघासारखे काळीज ही म्हण सार्थ असणारे उदयनराजे. कोणाचाही विश्वाास बसणार नाही पण ते सन 2010 पासून पूर्ण शाकाहारी आहेत. दोन-तीन दिवस न झोपता, तहान भूक-विसरुन, कायमच मुळाशी जोडलेला, अत्यंत प्रेमळ पण अन्याय दिसताच लालबुंद होणारे हे व्यक्तीमत्व. उच्चविद्याविभुषित, इंग्रजी, हिंदीवर प्रभुत्व आणि खेड्यातील मराठी भाषा बोलणारा हा माणुस स्वत:च्या खिशात मोबाईल ठेवून, पी.ए. शिवाय, जनतेशी थेट संवाद
साधतो. जलमंदीर हे संकटात अडकलेल्या जनतेचे संकटमोचक मंदिर आहे. इथं सर्व आजारावर उदयनराजेंची मात्रा लागू पडते. चुटकी सरशी इलाज होत असतो म्हणूनच राजे दरबारी असतात तेव्हा गर्दीचा महापूर असतो.
जसा त्यांच्या गाडीचा वेग तसाच त्यांच्या सकारात्मक विकासकामांचाही वेग जादा आहे. त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येक माणसाला ते भेटुन तातडीने त्यांच्या “ पध्दतीने ” न्याय देतात. जरी माध्यमांमध्ये त्यांची दबंग खासदार अशी प्रतिमा असली तरी चारित्र्याने अभंग आहेत. अंगात अरबाट ताकद असलेले उदयनराजे, इतकंच काय त्यांचे चिरंजीव युवराज वीरप्रतापसिंह हे मातोश्री श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे यांचे समवेत, वयाच्या 11 व्या वर्षी 12.30 एव्हरेस्टचा बेस कॅम्प चढुन गेले आणि ज्याची दखल 2017 मध्ये जगात सर्वांनी घेतली गेली. मोर्चाला जर सरकारला खऱ्या शेतकऱ्यांचे कायमचं कल्याण करायचं असेल, तर त्यांनी उदयनमहाराजांना मुख्यमंत्री, त्यासंबंधी अधिकार द्यावा ही तमाम जनतेची विचारधारा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्याशी अनेकांची दोस्ती आहेच शिवाय इतके चाहते आहेत की, सत्ता असो अथवा नसो महाराज कुठेही गेले तर मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे तरुणांची अलोट गर्दी त्यांच्याभोवती गोळा होते. जो पक्ष त्यांना घेवून महाराष्ट्रात फिरेल तोच पक्ष निश्चिातपणे सत्तेवर येईल पण मी अगोदरच लिहिले आहे की, त्यांचा डी.एन.ए. रयतेचा आहे. महाराजांच्या प्रत्येक निर्णयावर, महाराजांच्या प्रत्येक हालचालीवर, राजकीय जडणघडणीत आधारवड बनून मायेची सावली, प्रेमाचा ओलावा असलेल्या राजमाता श्री. छ. कल्पनाराजे आई साहेब महाराज यांचा देखील सिंहाचा वाटा आहे हे त्रिकालाबाधित, सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे.
राजेंवर निखळ प्रेम करणार्या् चाहत्यांना नेहमी वाटतं की, महाराजांनी खळखळून हसावं आणि हसवावं ! कार्यकर्त्यांना जीव लावावा महाराजांनी ! सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडवाव्यात महाराजांनी ! थंडीत रस्त्यावर कुडकुडत असलेल्या निराश्रितांना मायेची चादर घालावी महाराजांनी ! रूग्णालयात लाखोची बिले माफ करण्यासाठी फोन करावेत महाराजांनी ! कार्यकर्त्यांना ताकद द्यावी महाराजांनी ! रागवावं महाराजांनी अन् दोन मिनिटात जवळ करावं महाराजांनी ! गरीब-श्रीमंत मतभेद न करता सर्वसामान्यांशी नाळ जोडावी महाराजांनी ! भुकेलेल्यांना दोन घास भरावावेत महाराजांनी ! शेतकऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडाव्यात महाराजांनी ! ओटात तेच पोटात, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता जनतेचे पोटतिडकीनं प्रश्ना मांडावेत महाराजांनी ! राजघराण्यात जन्माला येऊनही वागणं-बोलणं सरळ-साधं, आचार-विचार कल्पनाशक्तीच्या पलिकडचं ! ध्यास सर्वसामान्यांच्या विचारांचा ! राज्यातील नव्हे तर देशातील लाखो तरूणांचे आयडॉल ! खा. श्री. छ. उदयनराजेच खरे जनकल्याणकारी नेतृत्व सर्वसामान्य जनतेच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवत आहेत. माझ्या सारखे लाखो मावळे राजेंवर जीव ओवाळून टाकतो. आई जगदंबेनं आमचे नेते, छत्रपती शिवरायांचे तेरावे थेट वंशज, रयतेचे राजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आरोग्यदायी उदंड आयुष्य द्यावं हीच प्रार्थना
!! राजे आपणास मानाचा मुजरा !!
Home Politics|Satara District Satara City जनकल्याणकारी, बुलंद, झुंजार नेतृत्व “उदयनराजे” – सुनिल काटकर





