साताऱ्यातील पानपट्टीमध्ये गांजा व गुटख्याची सरास विक्री होत असल्याने अन्न औषध व पोलीस विभागाची विश्वासार्हताच कमी झाल्याचे चित्र एक प्रकारे दिसून येत आहे गांजा गुटख्याबरोबर दहा रुपयाची रेडीमेड गांजा भरण्याची पाईपची सर्रास विक्री होत असल्याने युवा पिढीला गांजा ओढणे सोपे झाले आहे यावरही अन्न औषध विभाग काही कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
सातारा शहरांमध्ये बंदी असलेला गुटखा व गांजा विक्रीचे प्रमाण वाढल्याने युवा पिढी एक प्रकारे बरबाद होत असून याला अन्न औषध विभाग व पोलिस आळा घालत नसल्याने सातारा शहरात चौका चौकातील पानटपरी मध्ये गांजा, गुटका गांजाच्या पाईपची विक्रीचे प्रमाण वाढू लागले आहे
सातारा पालिकेच्या पार्किंग मध्ये दिवसाढवळ्या दम मारो दम
कमानी हौदासमोरील सातारा पालिकेच्या मालकीच्या असलेल्या पार्किंग मध्ये दिवसाढवळ्या गांजा व सिगरेटचा धूर निघत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत असून सदर पार्किंग मधून येणाऱ्या धुराचा बंदोबस्त सातारा पालिकेने करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे गणेश मंदिराच्या साईडला पडदा बांधून गांजा व सिगरेटचे दिवसाढवळ्या धूर येत असल्याचे चित्र सातारकर नागरिक बघत असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करून या धुरापासून मुक्ती करावी अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली आहे
कोटेश्वर ग्राउंड, आंबेदरे येथील पट्टी नावाचे शिवार, क्रांती स्मृती मैदान, केसरकर पेठेतील जुना दवाखाना, माळवाडी रोड, येवतेश्वर घाटात युवा पिढी गांजा व गुटखा घेऊन आपला आनंद द्विगणित करताना दिसून येते याकडे मात्र सातारा पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे,अन्न औषध विभाग ही नुसता वर्षातून एकदा ठरलेल्या पानटपऱ्या, दुकानांकडून लक्ष्मी दर्शन घेऊन कोणतीही कारवाई करत नसल्याने अन्न व औषध विभागच बरखास्त करावा अशी काही मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे
शाहूपुरी पोलीस स्टेशनची व अधिकार्यांची बघायची भूमिका ठरतेयं जीवघेणी
शाहूपुरी पोलीस स्टेशन व संबंधित अधिकारी यांची भूमिका पहिल्यापासूनच संशयाच्या भूमिकेत राहिली आहे काही अधिकारी व कर्मचारी वगळता ही भूमिका संशयाची राहिली आहे गांजा व गुटख्याची विक्री बऱ्यापैकी शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच होत असून शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना काही कानकून नाही का याचे आश्चर्य मात्र सातारकर जनतेला वाटत असून आता तरी शाहूपुरी पोलीस स्टेशनला जाग येणार का असा प्रश्न सातारकर जनतेला पडलेला आहे