करोनापासून सावध रहा मास्क वापरा काळजी घ्या सभापती अनिता घोरपडे यांचे आवाहन

247
Adv

सातारा शहर व उपनगरात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे गेल्या चोवीस तासात तब्बल पंधरा रुग्ण शहरात आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे . सातारकरांनी सतत मास्क वापरून गर्दीत जाणे टाळवे असे आवाहन सातारा पालिकेच्या आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी केले आहे .

गेल्या अकरा महिन्यात करोनाचा सक्षमपणे मुकाबला करणाऱ्या सातारा पालिकेच्या आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले .आरोग्य सभापतींनी कणखर भूमिका घेतल्याने लक्ष्मी टेकडी परिसरात करोनाचे संक्रमण अत्यंत मर्यादित राहिले . मात्र अलीकडच्या पंधरवडयात पुन्हा सातारा शहर व उपनगरामध्ये करोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत . अनिता घोरपडे यांनी लगेच आरोग्य विभागाच्या पथकाची बैठक घेऊन संक्रमण प्रतिबंधाचे आदेश दिले आहेत .

गेल्या चोवीस तासात सातारा शहरात चार प्रतापगंज पेठेत दोन सदरबझार येथे तीन, रांगोळे कॉलनी येथे एक विक्रांत नगर येथे एक, संभाजीनगर एमआयडीसी येथे एक,मोळाचा ओढा येथे एक असे तेरा रुग्ण करोना संक्रमित आढळल्याने आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत . आरोग्य सभापती यांच्या आग्रहातून मास्क वापरा करोना टाळा असा सातारकरांना संदेश देणारी रिक्षा सातत्याने शहरातून फिरविली जात आहे . सातारकरांनी काही तापाची सौम्य लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, तोंडावर सातत्याने माक वापरावा, सातत्याने डेटॉलने हात स्वच्छ धुत रहावेत, सातारकरांनी कारणास्तव घराबाहेर पडू नये, गर्दीची ठिकाणी कटाक्षाने टाळावीत असे आवाहन अनिता घोरपडे यांनी सातारकरांना केले आहे . शहरात विनामा स्क फिरणाऱ्यांना पाच शे रुपये दंड करण्याची मोहिम गतीमान करण्यात येईल असा इशारा आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी दिला आहे .

Adv