Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City यशस्वी उपनगराध्यक्ष शेंडे यांनी सादर केले 307 कोटी रुपयाचे बजेट ,बजेट एकमताने...

यशस्वी उपनगराध्यक्ष शेंडे यांनी सादर केले 307 कोटी रुपयाचे बजेट ,बजेट एकमताने मंजूर

509
Adv

आमदनी अठ्ठण्णी खर्चा रुपाया असे काहीसे स्वरूप असणारे दोन लाख चार हजार रुपये अखेरची शिल्लक दाखविणारे ३०७ कोटी ४७ कोटी ६६ हजार २०४ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सातारा पालिकेच्या विशेष सभेने शुक्रवारी विरोधकांच्या उपसूचना स्वीकारत मंजूरी दिली .

यंदाचे अंदाजपत्रक पाणी व घरपट्टीत कोणतीही वाढ न करणारे असल्याने सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे . हद्दवाढीनंतर महसुली भांडवली अनुदानामुळे पालिकेचे बजेट तीनशे कोटीचा टप्पा ओलांडून गेलेला असताना घर व पाणीपट्टी चे नित्वळ उत्पन्न १९ कोटी ७५ लाख रुपयांवर मर्यादित राहिल्याने पालिकेचा खिसा रिकामा होण्याची वेळ आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे . तब्बल दोन तासाच्या ऑनलाईन सभेत चर्चा कमी तांत्रिक त्रुटींचा गोंधळच खूप समोर आला . वेबेक्स तंत्रप्रणालीच्या प्रक्षेपणात वारंवार व्यत्यय येत राहिल्याने नगरसेवकांना बजेटच्या संपूर्ण तरतुदी पूर्ण स्पष्टतेने पोहोचल्या नाहीत . एकीकडे पालिकेने दोन लाख चारशे चोवीस रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केलेले असताना तब्बल 34 कोटी रुपयांच्या पूर्णतः वसुलीचे मोठे आव्हान वसुली विभागाला पेलावे लागणार आहे .

पालिकेच्या यंदाच्या नफा तोटा ताळेबंदाच्या महसुली अंदाजपत्रकात उत्पन्नाच्या बाजूला मालमत्ता कर 13 कोटी ७५ लाख , पाणीकर 6 कोटी , विशेष स्वच्छता कर 1 कोटी 20 लाख , अन्निशमन कर 20 लाख , हद्दवाढ क्षेत्रातील महसूल 1 कोटी 75 लाख , इमारत भाडे व खुल्या जागा भाडे 1 कोटी 20 लाख , हातगाडा परवाना फी सत्वीस लाख रुपये , नाट्यगृह भाडे दहा लाख रुपये , विकास कर 3 कोटी , प्रिमियम 2 कोटी , मंडई फी9 लाख रुपये महसुली अनुदाने 34 कोटी 43 लाख , भांडवली अनुदाने 122 कोटी70 लाख दहा हजार असे उत्पन्न अपेक्षित आहे . खर्चाच्या ठळक बाबीमध्ये भांडवली विकास कामे 202 कोटी 78 लाख रुपये , कर्मचारी वेतन भत्ते 23 कोटी23 लाख रुपये , निवृत्ती वेतन15 कोटी 10 लाख रुपये , सातवा वेतन आयोग सव्वातीन कोटी , प्रशासकीय खर्च 8 कोटी 46 लाख 10 हजार , मालमत्तांची देखभाल दुरुस्ती 7 कोटी 98 लाख शिक्षण मंडळ अनुदाने तीन कोटी , शासकीय कर्ज परतफेड 67 लाख रुपये , आरोग्य सुविधा 7कोटी 17 लाख , पाणी पुरवठा सुविधा 3 कोटी 72 लाख , निवडणूक खर्च 1 कोटी 80 लाख रुपये , जयंती कार्यक्रम 40 लाख रुपये , पर्यावरण संतुलन पाच लाख रुपये , पाच टक्के दिव्यांग कल्याणकारी योजना एकोणचाळीस लाख , महिला व बाल कल्याणनिधी 39 लाख रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत . शिलकी अंदाजपत्रक सादर करताना करवसुलीचे मोठे आव्हान आहे . हद्दवाढीच्या क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांकरिता बावीस कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी अंदाज पत्रक सादरीकरणानंतर पत्रकारांना दिली . सातारा शहरातील बिगरनिवासी मिळकतींना तीन महिन्यांसाठी घरपट्टी माफी देण्यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत . मात्र घरपट्टी माफीची ही संवलत ज्यांनी मागील घरपट्टी पूर्णपणे भरली आहे त्यांनाच ही सवलत लागू असल्याचे उपनगराध्यक्ष शेंडे यांनी सांगितले .

चौकट –

आरंभीची शिल्लक –

307 कोटी 45 लाख 66 हजार

अखेरची जमा –

2 लाख 424

एकूण जमा –

307 कोटी 47 लाख 66 हजार 424

रुपया असा येणार

नगरपालिका कर – 12 पैसे

महसुली अनुदाने – 16 पैसे

भांडवली अनुदाने – 47 पैसे

नगरपालिका मालमत्ता फी – 3 पैसे

व्याज व विलंब आकार – 2 पैसे

इतर उत्पन्न – 1 पैसे

ठेवी डिपॉझिट – 9 पैसे

खर्च –

आस्थापना खर्च – 18 पैसे

दुरुस्ती देखभाल – 3 पैसे

आरोग्य सुविधा – 2 पैसे

पाणी पुरवठा – 2 पैसे

शिक्षण – 1 पैसे

विकास कामे – 68 पैसे

संकीर्ण खर्च – 1 पैसे

असाधारण खर्च – 5 पैसे

Adv