सातारा शहरात पालिकेच्या हद्दीतच अनधिकृत टपऱ्यांच्या शेजारी हिरव्या जाळ्याच्या अडून काय उद्योग चालतात याकडे पालिका लक्ष देणार का असाच प्रश्न उपस्थित झाला आहे
जी तत्परता कस्तुरबा पाडण्यात दाखवली ती तत्परता पालिका हिरव्या जाळ्याच्या मागे काय चाललंय हे काढण्यासाठी दाखवणार का
सातारा पालिकेच्या हद्दीत अनधिकृत टप्प्यांनी ऊत आणलेला आहे या कमीकी काय म्हणून त्यांच्या शेजारीच हिरव्या जाळ्या लावून काय उद्योग चालतात याकडे पालिकेचे स्पष्ट दुर्लक्ष झाले आहे काही हिरव्या जाळीच्या आडून धुराचे लोट येतात विचित्र वास येतो सर्वसामान्य नागरिक महिला वर्ग यांना या रस्त्यावरून येणाऱ्या जाण्यावरून त्रास होत असून पालिकेने अशा हिरव्या जाळ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सातारकरांकडून होत आहे
सार्वजनिक बांधकाम विभाग ऑफिस गोडोली आरटीओ ऑफिस राधिका रोड कुबेर विनायक मंदिर स्टँड रोड मोती चौक राजवाडा चौपाटी ही प्रमुख ठिकाणी जाळ्यांनी व्यापली असून पाहिले का यावर कारवाई करणार का याकडे आता लक्ष लागले आहे






