केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने राजीव गांधी फाऊंडेशन या संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे. विदेशातून देणग्या मिळवण्यासाठी हा परवाना आवश्यक असतो. तोच रद्द करण्यात आल्याने या संस्थेला आता विदेशातून देणगी मिळवण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
या संस्थेला विदेशातून मिळालेल्या देणगीचा दुरूपयोग केला जात असल्याचा गृहमंत्रालयाचा आरोप होता. गृहमंत्रालयाने या संबंधात चौकशी करण्यासाठी एक आंतरमंत्रालय समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार राजीव गांधी फाऊंडेशनचा हा एफसीआरए परवाना रद्द कण्यात आला आहे. माजी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत तर संस्थेच्या विश्वस्त मंडळावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, कॉंग्रेस खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचा समावेश आहे.