Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City बुलेटच्या चॉईस साठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील साताऱ्यात

बुलेटच्या चॉईस साठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील साताऱ्यात

389
Adv

पारंपारिक कुस्ती या क्रीडाप्रकाराला उत्तेजन देण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यंदाचा महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील एक लाख रुपये किमतीची बुलेट देण्याचे जाहीर केले होते या बुलेटच्या चॉईस साठी पृथ्वीराज पाटील आज येथील बॉम्बे चौकातील बुलेट शोरूम मध्ये दुपारी दाखल झाला क्लासिक 350 रॉयल एनफिल्ड बनावटीचे टॉप मॉडेल त्यांनी पसंत केले श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यालासुद्धा छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने युनिकॉर्न गाडी भेट देण्यात येणार आहे

यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा सोहळा जितका रंगला त्यापेक्षा बक्षिसाच्या रकमेत करून रंगलेला राजकीय वाद जास्त चर्चेचा ठरला मात्र महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी यांच्यावर बक्षिसांची खैरात झाली यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र केसरी युवराज पाटील यांना एक लाख रुपये किंमतीची बुलेट देण्याचे जाहीर केले श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूहाने दिलेल्या शब्दाला जागत तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी केली मंगळवारी महाराष्ट्र केसरी विजेते पृथ्वीराज पाटील साताऱ्यात रॉयल इन्फिल्ड च्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील शोरूम मध्ये दाखल झाले पर्पल सिल्वर पर्पल ची क्लासिक 3:50 टॉप मॉडेल गाडी त्यांनी पसंत केले या गाडीचे वितरण लवकरच खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांना केले जाणार आहे

याशिवाय अटीतटीच्या सामन्यात निर्णय क्षणाला काही गुणांच्या फरकाने पराभूत झालेले उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांच्या ही कामगिरीची दखल खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे त्यांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने याच कार्यक्रमामध्ये युनिकॉर्न नावाची गाडी भेट म्हणून दिली जाणार आहे

Adv