चार दिवसापूर्वी साताऱ्यातील चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केलाअसून या प्रकरणी राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीचाकणकर,विधान परिषद उपसभापती नीलम गोरे,भाजपच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यासह आदी महिला गप्प का असा प्रश्न सातारकरांना नागरिक विचारत आहेत
राजकारणा प्रकरणी या महाराष्ट्रातील तीनही महिला सदस्य आरोप करताना पूर्ण तुटून पडताना आपल्याला दिसून येतात मात्र लहान मुलीचे अपहरण होऊन तिच्यावर अत्याचार होतो या सर्व प्रकरणी राज्यातील वरिष्ठ पदावरील व सातारा जिल्ह्यातील महिला गप्पा असल्याने त्या बालिकेला न्याय मिळणार का असा प्रश्न पडला आहे
गृहराज्यमंत्री देसाई यांच्यावर आरोप करण्यासाठी चित्रा वाघ या साताऱ्यात आल्या होत्या.मात्र या बालीकेसाठी त्या साताऱ्यात न आल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर ही याप्रकरणी शांत असून या बालिकेने दाद कोणाकडे मागायची अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येते





