Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District आ जयकुमार गोरे शनिवारी स्वीकारणार जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार

आ जयकुमार गोरे शनिवारी स्वीकारणार जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार

590
Adv

माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांची नुकतीच भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून शनिवारी मोठ्या दिमाखात ते आपला सातारा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार स्विकारणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले

आमदार जयकुमार गोरे यांच्या पदग्रहण समारंभ वेळी त्यांचे सातारा शहरात भव्य स्वागत होणार असून शनिवारी दिनांक 26 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल लेक व्ह्यू येथे हा स्वागत व पदग्रहण समारंभ आयोजित केला आहे

आमदार जयकुमार गोरे यांच्या निवडीने जिल्ह्याला पुन्हा एकदा एक तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष मिळाल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा भारतीय जनता पार्टीला नक्कीच फायदा होणार असून जिल्ह्यात भाजपची ताकद जोमाने वाढवणार असल्याची प्रतिक्रिया नूतन जिल्हाध्यक्ष व माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱनामाशी बोलताना सांगितले

Adv