भाजपचा विठ्ठल 2 कोटीच्या फर्निचरच्या टेंडरवर उभा…

267
Adv

भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यातील विठ्ठल तब्बल दोन कोटीच्या फर्निचरच्या टेंडरवर उभा असल्याने जिल्ह्यातील निष्ठावंत पदाधिकारी नाराज होऊ लागले असून धैर्यच्या साथीने विठ्ठला च्या लीला येत्या काळात चव्हाट्यावर येणार ही काळया दगडा वरची पांढरी रेष असल्याचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले

भारतीय जनता पार्टीचे आजपर्यंत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते या जिल्ह्यात होऊन गेले त्यांनी कोणत्याही पदाची टेंडरची अपेक्षा ठेवून पक्षासाठी काम केले नाही मात्र आत्ताचे जिल्ह्याचे पदाधिकारी पक्षाचे नाव वापरून कोटीच्या कोटी टेंडरआपल्या खिशात पाडून आपला घरचा उदरनिर्वाह चालवत असल्याचे दिसून येते या सर्व प्रकाराला सातारा जिल्ह्यातील निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते पुरते वैतागले असून हे असंच चालत राहिले तर खरे निष्ठावंत घरी बसणार असल्याचा इशारा नाव न छापण्याच्या अटीवर काही जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनी दिला असून भारतीय जनता पार्टीचा विठ्ठल तब्बल दोन कोटीच्या टेंडर उभा असल्याने निवडक पदाधिकारी यांनी आपली मनातील खदखद व नाराजी व्यक्त केली

सातारा जिल्ह्यात अनेक असे निष्ठावंत भाजप पदाधिकारी आहेत ज्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे,अशा दिग्गज नेत्यांबरोबर काम केले त्यावेळी कोणत्याही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याने टेंडरची अपेक्षा केली नव्हती आता मात्र या उलट चित्र असून काँग्रेस विचारी धैर्यरुपी जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्ह्याच्या पदावर असल्याने ही टेंडरची माया गोळा होत असून हे थांबले नाही तर पक्षाचे काम करण्यास आम्हाला तीळ मात्र रस नसल्याचे जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले

Adv