पालकमंत्री पद नको ही माझी स्वतःचीच भूमिका – धनंजय मुंडे

230
Adv

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वागत करत अजित दादांचे अभिनंदन केले असून अजित दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याप्रमाणे विकास व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

बीड जिल्ह्यात सध्या सुरू असलेली सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आपणच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मला न करता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे अशी विनंती केली होती, असेही धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच सद्यस्थितीमध्ये मला कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ नये, याबाबतही आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती केली होती, त्यांनी ती मान्य केल्याबद्दल त्यांचे आभारही धनंजय मुंडे यांनी मानले असून, आपल्यावर देण्यात आलेल्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

Adv