अकलूज मध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अभिनंदनचा बॅनर अज्ञातने फाडला असून या भ्याड कृत्याचा माजी आमदार राम सातपुते यांनी निषेध नोंदवला
राज्यात पालकमंत्री पदाच्या बाबतीत बरीच खलेबते सुरू आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली या नियुक्तीनंतर त्यांच्या अभिनंदनचे फ्लेक्स बोर्ड हे अकलूज येथे लावण्यात आले होते मात्र अज्ञातांनी पालकमंत्री असा उल्लेख असलेला फ्लेक्स फाडल्याने किरकोळ तणाव निर्माण झाला होता
काय म्हणाले माजी आमदार राम सातपुते
👇🏻
या विकृतीचा जाहीर निषेध!
अकलूजमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचा अभिनंदनाचा बॅनर फाडण्यात आला. या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध! पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की भ्याडपणे फ्लेक्स फाडून विकृतीच प्रदर्शन करणाऱ्या अकलूजमधील या प्रस्थापित गुंडांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती त्यांनी सोशल मीडिया द्वारे केली आहे