पालकमंत्री पदावर आपल्या नेत्याची वर्णी लागली म्हणून भरत गोगावले व दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांनी आपला हिसका दाखवत थेट महायुतीला दणका दिला मुख्यमंत्री दावोसला असतानाही पालकमंत्री पदांच्या नियुक्तीला स्थगिती दिली
दोन्ही मंत्र्यांच्या मागे फक्त आर्थिक नियोजन करण्यासाठीच कार्यकर्त्यांची आता लगबग दिसते या मंत्र्यांवर संकट येते त्या मंत्र्यांसाठी कोणीही भांडताना जिल्ह्यात दिसत नसल्याने सबकुछ कार्यकर्त्यांना लक्ष्मी दर्शनाची आसअसे चित्र निर्माण झाले आहे
भाजपचे संकट मोचक म्हणून ज्यांना संबोधले जाते ते गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीलाही स्थगिती आल्याने नक्की भाजपचे संकटमोचकच संकटात सापडले असल्याचे दिसून येते
ज्या सातारा जिल्ह्याने क्रांतिकारी इतिहास घडवला त्या सातारा जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते अथवा दोन्हीही मंत्री महोदयांचे कार्यकर्ते गप्प बसले असल्याचे दिसून येते एवढी महत्वाची खाती भाजपकडे असून सुद्धा जर पालकमंत्री पदासाठी भांडता येत नसेल तर आपल्या पदाचा उपयोग तरी काय असा प्रश्न त्यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे
दोन्हीही मंत्री महोदयांचे मागेपुढे पदे घेऊन मिरवणाऱ्यांनी जनाची नाही मनाची तरी लाच बाळगून आपला क्रांतिकारी बाणा दाखवावा अन्यथा सबकुछ मिली बघत असल्याचे चित्र जिल्ह्याला पाहायला मिळते
सातारा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्वत्तरीही जिल्ह्यातील दोन्ही मंत्री महोदयातील एका मंत्री महोदयांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले असते तर भाजप वाढण्यास अजून बळ मिळाले असते मात्र क्रांतिकारी जिल्ह्यात एकही कार्यकर्ता अथवा भाजपचे पदाधिकारी ठोस अशी भूमिका घेत नसून नक्की भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात दिसते की भाजपला पालकमंत्री पद मिळू नये