जिल्हा कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांने केली प्रदेशच्या नेत्याची हकलपट्टी?

67
Adv

पक्षाचे विरोधी काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील एका कर्मचाऱ्याने चक्क प्रदेश नियुक्त असलेल्या रामकृष्ण वेताळ यांच्या हकालपट्टी? केल्याने जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यात काही अलबेल नाही असे चित्र आहे

रामकृष्ण वेताळ यांची पक्षविरोधी कारवाई केली यामुळे हकलपट्टी करण्यात आली पक्षविरोधी कारवाई केल्याची हा अंतर्गत बाब असली तरी जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष व आमदारांचे यातून कातडी बचाव धोरण असल्याचे दिसून येते

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत लोकसभा विधानसभेला भाजप विरोधात काम केलेल्यांना जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांचे नेतृत्वाखाली उमेदवारी मिळाली आहेत हे भाजपला चालते मात्र अपक्ष उमेदवारी करणे चालत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल

जिल्हाध्यक्ष अतुल भोसले झाल्यापासून जिल्हा भाजपचे काही खरे नाही असे चित्र आहे आता तर चक्क एका कर्मचाऱ्याने प्रदेशच्या नेत्याची हकलपट्टी केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

भाजप जिल्हाध्यक्ष नावाला जिल्हाध्यक्ष आहेत पण चालवणारे मात्रअनेक अध्यक्ष असून देव भाऊंच्या पक्षात सातारा जिल्ह्यात कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी अवस्था दिसते

Adv