भाजपच्या विरोधात लोकसभेला तुतारीचे काम केलेल्यांना आता कमळाचे वेध लागले असून जिल्हा परिषद निवडणुकीत मूळ भाजपच्या निष्ठावंत डावलून तुतारी वाल्यांना उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष लागले आहे
भाजपचा लोकसभेत विजय झाला असला तरी एवढे मोठी भाजपचे जिल्ह्यात ताकत असताना अवघ्या पस्तीस हजार मतांनी भाजपचा विजय झाला त्याला कारण ही तसेच की तुतारीच्या निष्ठावंत शिलेदारांनी केलेले तुतारीच्या निष्ठावंत आमदार महोदय यांचे काम त्यामुळे निवडणूक प्रभारी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व धैर्यशील कदम यांनी मूळ भाजपच्या उमेदवाराला ताकद द्यावी अशी अपेक्षा भाजपचा कार्यकर्ता करत आहे
जे कार्यकर्ते निष्ठावंत नेत्याचे राहिले नाहीत तेच कार्यकर्ते भाजपचे कसे निष्ठावंत राहतील हा खरा आता प्रश्न पडला आहे
मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा व विधानसभेला भाजपच्या समर्थनात उत्कृष्ट काम केले त्यामुळे जिल्ह्यात भाजप वाढली आता मात्र तुतारी चे काम करणाऱ्यांना म्हणजेच विरोधात काम केलेल्यांना संधी न देता निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्याला संधी मिळावी अन्यथा जिल्ह्यात भाजपची काँग्रेस होणार हे त्रिवार सत्य असल्याचे बोलले जात आहे





