भाजपमध्ये नाही आमदार पदाला किंमत?

113
Adv

जिल्ह्यातील धैर्य गेलेला दादाला आपली खुर्ची सोडवेना अशीच परिस्थिती सध्या तरी दिसते मंत्रालयात मंत्री महोदयांच्या शेजारी महत्वाच्या बैठकीच्या वेळी बसण्याचा प्रोटोकॉल हा संबंधित तालुक्यातील आमदार महोदयांचा असतो मात्र जलसंपदा मंत्र्यांच्या मीटिंगमध्ये ही जागा धैर्य गेलेल्या दादाने बळकवली असण्याने उलट सुलट चर्चेला उदान येत आहे

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी बेरजेचे राजकारण केले मात्र त्यांच्याच तालुक्यातील आमदारांना मंत्रालयात चक्क शेवटची खुर्ची मिळत असेल तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित योजने संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी सोळशी धरण प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कृष्णा खोऱ्या अंतर्गत विविध विषयावर चर्चा करण्यात आली बैठकी साठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ मनोज घोरपडे, आ.सचिन पाटील , श्री धैर्यशील कदम उपस्थित होते मात्र आमदार मनोज घोरपडे हेच शेवटच्या खुर्चीवर बसल्याने नक्की आमदारांचा मान सन्मान राखणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे

सर्वसामान्याच्या कुटुंबातील आमदार झालेल्या व्यक्तीला पाहून काँग्रेस विचारांचे धैर्य गेलेले आपण अनेकदा पाहिलेले आहे मात्र आता आपण कुठल्याही पदावर नाही तरी आपण आमदारांच्या अगोदर मीच पुढे खुर्चीवर बसणार असा बाल हट्ट धरणारे? सातारा जिल्ह्यात हे ते मोठे कर्तृत्व प्रथमच दिसते

Adv