मुंबईत ठरली भाजपची विधानसभेची रणनीती

971
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघा संदर्भात आढावा बैठक मुंबई येथे संपन्न झाली यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री,महाराष्ट्र प्रभारी ना.भूपेंद्र यादव,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,खासदार श्री छ उदयनराजे भोसले केंद्रीयमंत्री मुरलीधरमोहोळ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंकजाताई मुंडे, आ.जयकुमार गोरे,व वरिष्ठ प्रमुख नेते मंडळीसह सातारा जिल्हा भाजपचे सर्व सरचिटणीस उपस्थित होते

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा सातारा जिल्ह्यात रोवण्यासाठी खासदार छ उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रणनीती आखली आहे या रणनीतीनुसार सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे कराड उत्तर, कराड दक्षिण,कोरेगाव आणि सातारा व वाई या पाच विधानसभा मतदार संघात खा छ उदयनराजे लवकरच सक्रिय होणार आहेत

खा छ उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत संघर्ष पूर्ण विजय मिळवून भाजपचा खुट्टा सातारा जिल्ह्यात बळकट केला आहे . विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याच यशाची पुनरावृत्ती करायची आहे .सातारा जिल्ह्यामध्ये पाटण व कोरेगाव हे विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे असून वाई मतदार संघ हा राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्याकडे आहे येथून आमदार मकरंद पाटील प्रतिनिधित्व करतात कराड उत्तर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील आहेत याशिवाय कराड दक्षिण मध्ये काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण प्रतिनिधित्व करत आहेत .कराड उत्तर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मनोज दादा घोरपडे धैर्यशील पाटील रामकृष्ण वेताळ तसेच कराड दक्षिण मध्ये भाजपचे अतुल बाबा भोसले यांनी प्रचंड जोर लावत आणि कमालीची एकी दाखवत खासदार उदयनराजे यांना जास्तीत जास्त आघाडी देण्याचा प्रयत्न केला होता कराड उत्तर मध्ये ही एकी प्रचंड प्रमाणात दिसून आली .सातारा विधानसभा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रामाणिक काम करत सातारा मतदारसंघावरचा आपला एक हाती करिष्मा दाखवून दिला होता .त्यामुळे शेवटच्या दहा मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवत विजयाची नोंद केली यामुळे भाजपचा उत्साह वाढला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय समन्वय उत्तम आहे महायुतीच्या प्रचाराची आणि रणधुमाळीची कमान ही खासदार उदयनराजे भोसले यांच्याच खांद्यावर राहतील अशा वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली आहे

. शिंदे गटासाठी सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे ही जोड गोळी छ उदयनराजे यांच्याबरोबर समन्वयाने सक्रिय राहणार आहे तसेच राष्ट्रवादीचे अजित दादा पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचा वाई मतदारसंघात एक हाती करिष्मा असला तरी महाविकास आघाडीने येथे जोरदार मोर्चे बांधणी केली आहे .लोकसभा निवडणुकांच्यावेळी उदयनराजेसाठी आमदार मकरंद पाटील यांनी अखेरच्या टप्प्यात आपला राजकीय मुत्सद्दीपणा दाखवला होता

Adv