नुकतेच भारतीय जनता पार्टीचे दोन दिवसापूर्वी शिर्डी येथे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते त्यामुळे अकलूजचे मोहिते पाटील पुन्हा महायुतीत सक्रिय झाले असेच म्हणावे लागेल
लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप विधान परिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे अदृश्य होते लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार रणजीतसिहं नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून आले या सर्व प्रक्रियेत रणजितसिंह मोहिते पाटील कुठेही दिसून आले नसल्याने त्यांच्यावर विरोधी काम केल्याचा ठपका लागला होता तसेच फलटणचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हेही लोकसभा,विधानसभेमध्ये अदृश्य होते लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळात याच श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका झाली मात्र त्यांनी ब्र शब्द काढला नाही त्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या महायुतीत पुनरागमानाची चर्चा आता जोर धरू लागली असल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची महायुतीमध्ये राजकीय एन्ट्री कधी अशी चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळते
मोहिते पाटील यांच्या कुटुंबाकडून मला बदला घ्यायचं नाही असे एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे पुन्हा महायुतीतच दिसणार हे नक्की?