खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अमित कदम हे साताऱ्यात माजी नगरसेवक सागर पावशे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आल्याने सातारा जावली मतदार संघात चांगलीच चर्चा रंगली आहे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक सागर पावशे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात पावशे यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे नेते अमित कदम एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वीच परळी भागात दौरा करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता टीका केली होती त्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अमित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता टीका केली होती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे नेते अमित कदम हे दोघेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर सध्या टीका करताना दिसून येत आहेत त्यातच श्री पावशे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्हीही नेते एकत्र आल्याने सातारा जावली मतदारसंघात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या धक्का तंत्राचा अंदाज भल्या भल्या राजकीय विश्लेषण करणाऱ्यांना अजून आलेला नाही सागर पावशे यांच्या वाढदिवसाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचे नेते अमित कदम एकत्र आल्याने नवा राजकीय धक्का हा सातारा मतदारसंघात बसला हे नक्की







