जावली बाजार समिती निवडणुकीचा प्रश्न शरद पवार यांच्या दारी

609
Adv

जावली बाजार समितीच्या निवडणूक प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन जावली बाजार समिती निवडणुकीची सविस्तर माहिती दिली

जावली बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली असून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी एकत्र येऊन जावली बाजार समितीसाठी पॅनल उभे केले असून या विरोधात राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार व माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांनी या तीनही आमदारांना पॅनल उभे करून आव्हान दिले आहे

राष्ट्रवादीचे आ मकरंद पाटील व शशिकांत शिंदे हे पक्षाबरोबर न राहता भाजपचे आमदार यांच्याशी हात मिळवणी करून जावली बाजार समितीसाठी निवडणूक लढवत असल्याने दीपक पवार यांनी नाराजी व्यक्त केली व याबाबतची सविस्तर माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर आज घातली

काही दिवसांपूर्वीच अजितदादा पवार यांनी जावली मध्ये मेळावा घेऊन जावली मध्ये चमत्कार घडेल असे जाहीर सभेमध्ये वक्तव्य केले होते मात्र दादांची पाठ फिरताच येऊ घातलेल्या जावली बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन आमदार भाजपच्या आमदारांबरोबर जाऊन पॅनल उभे केल्याने राष्ट्रवादीतच फुट पडली असून अजित दादा यांचा दौरा एक प्रकारे फेलच म्हणावे लागेल

एकंदरच जावलीतील सर्व परिस्थिती दीपक पवार यांनी पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या कानावर घातल्याने पुढील महिन्यात सातारा दौऱ्यावर येऊन याप्रकरणी स्पष्ट बोलणार असल्याचे आश्वासन दीपक पवार यांना दिले व असेच पक्षाचे काम कर म्हणून शाब्बासकी ही दिली

सहकारातील निवडणूक जरी पक्षाच्या चिन्हावरती लढली जात नसली तरी प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला भाजपबरोबरच दोन हात करावे लागणार असून आत्ताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशी भाजप बरोबर हात मिळवणी केली तर पक्ष वाढणार कसा अशी खंत दीपक पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बोलताना व्यक्त केली

Adv