राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पहाण्याची जबाबदारी ना शिवेंद्रसिंहराजे दादांवर त्यांच्याकर्तबगारीमुळे सोपवलेली आहे.ना.शिवेंद्रदादा, राज्यामध्ये लोकसेवेचे काम करताना आपल्या घराण्याच्या उज्वल परंपरेप्रमाणे ऐतिहासिक कामगिरी बजावतील अशी खात्री आम्हा राजपरिवारातील सर्वांना आहे. त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीस तसेच जनसेवेच्या अविरत कार्यास आमच्या मनापासून नेहमीच शुभेच्छा आहेत अश्या शब्दात आज सुरगणा (नाशिक) संस्थानचे युवराज श्रीमंत रत्नशीलराजे पवार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना समक्ष भेटून सदिच्छा दिल्या.
आज नाशिक सुरगणा संस्थानचे युवराज श्रीमंत रत्नशीलराजे पवार यांनी ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा येथील निवासस्थानी सुरगणा संस्थानच्या वतीने आणि नाशिककरांच्या वतीने शाल-श्रीफळ आणि बुके देवून ना.श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे यांच्या केलेल्या सत्काराप्रसंगी श्रीमंत रत्नशीलराजे अनौपचारिक बोलत होते.
यावेळी झालेल्या चर्चेत श्रीमंत रत्नशीलराजे पवार यांनी आवर्जुन नमुद केले की, सन 2027 ला नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. या कुंभमेळयाचे पावित्र्य अधिकाधिक वृध्दींगत करण्यासाठी नाशिक-त्रयंबकेश्वर येथे दुरदृष्टीकोनामधुन काही सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. याबाबत स्थानिक गरज लक्षात घेवून, राज्यस्तरावरुन सुक्ष्म नियोजन आत्तापासूनच ना.शिवेंद्रदादांकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या माध्यमातुन केले जाईल याची खात्री आहे. तसेच राज्यातील दळणवळण गतीमान करण्यासाठी राज्यातील ग्रामिण मार्ग, जिल्हा मार्ग आणि राज्यमार्गांचे जाळे कानाकोप-यात निर्माण केले जाईल अशी अपेक्षा देखिल श्रीमंत रत्नशीलराजे पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
समाजाच्या दर्जेदार सुखसोयींसाठी सुरगणा संस्थानचा उल्लेख इतिहासात आढळुन येतो. पुरोगामी आणि आध्यात्मिक-सांस्कृतिक विचारांची सांगड घालुन सुरगणा संस्थानची आजची पिढी समाजसेवेसाठी कटीबध्द आहे. आमचे जेष्ठ बंधु आणि मार्गदर्शक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मामे भाऊ आणि सुरगणा संस्थानचे युवराज श्रीमंत रत्नशीलराजे पवार यांनी दिलेल्या आजच्या शुभेच्छा आम्हाला लाखमोलाच्या आहेत. सुरगणा युवराज यांनी 2027 मध्ये होणा-या कुंभमेळयाविषयी व्यक्त केलेल्या अपेक्षा निश्चितच स्वत: लक्ष घालुन पूर्ण करु अशी ग्वाही ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिली.
या भेटी प्रसंगी युवराज श्रीमंत रत्नशीलराजे यांचे समवेत अमित कुमार व अन्य मान्यवर उपस्थित होते.







