Friday, November 27, 2026
spot_img
Home Satara District जिल्हा परिषदेत नामनिर्देशित सदस्य नियुक्तीच्या हालचालींना वेग

जिल्हा परिषदेत नामनिर्देशित सदस्य नियुक्तीच्या हालचालींना वेग

84
Adv

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. या नियुक्त्यांसाठी पक्षनिहाय संख्याबळ निश्चित करण्याच्या दृष्टीने साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अंतर्गत नामनिर्देशित सदस्यांची संख्या, त्यांची पात्रता आणि नियुक्तीबाबतचे नियम २०२६ अधिसूचित करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या २० टक्के किंवा किमान एक सदस्य, यापैकी जी संख्या जास्त असेल त्याप्रमाणे नामनिर्देशित सदस्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे.
नामनिर्देशित सदस्य पदासाठी संबंधित उमेदवाराची पात्रताही नियम ४ नुसार तपासली जाणार आहे. तसेच नियम ५ नुसार जिल्हा परिषदेमधील मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्ष, गट, आघाडी किंवा फ्रंट यांच्या तौलनिक संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Adv