Thursday, November 19, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District दुष्काळाचे संकट गंभीर, पाणीपुरवठा विभाग मात्र सुस्त

दुष्काळाचे संकट गंभीर, पाणीपुरवठा विभाग मात्र सुस्त

44
Adv

एकीकडे दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना दुसरीकडे सातारा शहरात ठिकठिकाणी पाण्याची गळती सुरू असल्याचे चित्र आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना पाणीपुरवठा विभागाकडून गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना होताना दिसत नाहीत. बनकर साहेबांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शहाजी वाठारे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा आणि गरज पडल्यास विभागात बदल करावेत, अशी मागणी होत आहे.

शहरात फेरफटका मारला तर ठिकठिकाणी पाण्याची गळती आणि लिकेज सहज नजरेस पडतील;
मग पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नेमके करतात तरी काय?
दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे. मात्र शहरातील अनेक भागांत पाणी वाया जात असताना संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष कुठे आहे? बनकर साहेबांनी स्वतः शहराचा फेरफटका मारून परिस्थिती पाहावी आणि शहाजी वाठारे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची दखल घ्यावी. गरज पडल्यास जबाबदारी निश्चित करून अधिकारी बदलण्याचीही भूमिका घ्यावी.

Adv