Wednesday, November 11, 2026
spot_img
Home Satara District Karad दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार धैर्यशील कदम यांचा वाढदिवस साधेपणाने

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार धैर्यशील कदम यांचा वाढदिवस साधेपणाने

28
Adv

खटाव | महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानपरिषदेचे लोकप्रिय आमदार श्री. धैर्यशीलदादा कदम यांनी यंदाचा आपला वाढदिवस कोणताही अनावश्यक खर्च न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांचा वाढदिवस असून, वाढदिवसानिमित्त हार-तुरे, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणण्याऐवजी केवळ प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाढदिवसानिमित्त सकाळी ९ ते १० या वेळेत गोरेगाव (वांगी), ता. खटाव येथे, तर दुपारी १२ वाजल्यापासून पुढे पुसेसावळी येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार धैर्यशीलदादा कदम उपस्थित राहून सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
दुष्काळी परिस्थितीत उत्सवापेक्षा सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देण्याचा संदेश त्यांच्या या निर्णयातून देण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांना या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Adv