Monday, November 9, 2026
spot_img
Home Satara District Karad आनंद, समृद्धीचा दीप प्रत्येकाच्या जीवनात उजळो; आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून दीपावलीच्या शुभेच्छा!

आनंद, समृद्धीचा दीप प्रत्येकाच्या जीवनात उजळो; आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून दीपावलीच्या शुभेच्छा!

54
Adv

सातारा | दीपावली हा प्रकाशाचा, मांगल्याचा आणि आनंदाचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो. प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दीप उजळो, सर्वांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळो आणि सर्वांच्या आयुष्यात यशाची नवी पहाट उजाडो, अशा सदिच्छा आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केल्या.
दीपावलीचा सण हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा जपण्याचा सण आहे. सणाच्या माध्यमातून नाती अधिक दृढ व्हावीत, समाजात सकारात्मकता निर्माण व्हावी आणि प्रत्येकाने एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्व नागरिक, मतदारसंघातील बांधव, माता-भगिनी, युवा मित्र आणि कार्यकर्त्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत ही दीपावली सर्वांसाठी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो, अशी मंगलकामना आमदार मनोज घोरपडे यांनी केली.

Adv