Thursday, October 22, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District आजोबा किसन वीरांच्या वारसदारांना संचालकपद; पण अभिवादनाचा विसर!

आजोबा किसन वीरांच्या वारसदारांना संचालकपद; पण अभिवादनाचा विसर!

32
Adv

विद्यमान चेअरमन खासदार नितीन पाटील यांनी आपला दहा वर्षाच्या निकषाखाली जिल्हा बँक निवडणूकितून उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यानंतर सत्यजित वीर हे बिनविरोध संचालक झाले

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक किसन वीर यांचे नातू सत्यजित वीर यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या वीर कुटुंबाचे प्रतिनिधित्व पुन्हा एकदा संचालक मंडळात पोहोचल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मात्र, या निवडीनंतर एक बाब लक्षवेधी ठरली आहे. बँकेच्या आवारात असलेल्या आजोबा आणि संस्थापक किसन वीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचा सत्यजित वीर यांना विसर पडला का, असा सवाल उपस्थित होत आहे.

ज्या संस्थेच्या उभारणीत आजोबांचे मोलाचे योगदान आहे, त्याच संस्थेच्या संचालकपदी विराजमान होताना संस्थापकांच्या स्मृतींना अभिवादन झाले असते, तर या निवडीला ऐतिहासिक वारशाची भावनिक जोड मिळाली असती.

Adv