Saturday, October 3, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा बँकेच्या ‘लक्ष्मणरेषे’पलीकडे कोण? खासदार गटाचे लक्ष आता निर्णयाकडे!

जिल्हा बँकेच्या ‘लक्ष्मणरेषे’पलीकडे कोण? खासदार गटाचे लक्ष आता निर्णयाकडे!

204
Adv

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय समीकरणांना वेग आला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गटाशी संबंधित दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आता पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अंतिम उमेदवार निश्चित होण्यापूर्वी माघारीच्या टप्प्यात कोणता निर्णय घेतला जातो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः एकाच गटातील दोन दावेदारांपैकी कोण निवडणुकीच्या मैदानात कायम राहणार, याकडे खासदार गटाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, खासदार छ उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारणापेक्षा शेतकरी व कष्टकरी हिताला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गटाकडून काका धुमाळ आणि लक्ष्मण कडव हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय चर्चेला वेग आला आहे

जिल्हा बँक निवडणुकीत खासदार गटाची लक्ष्मणरेषा कोण ओलांडणार?’ हा प्रश्न सध्या जिल्हा बँकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Adv