जावली : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुनेत्रा ताई शिंदे यांनी जावली तालुक्यातून महिला प्रवर्गात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जावलीच्या सहकार क्षेत्रातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
सुनेत्रा शिंदे यांनी यापूर्वी जिल्हा बँकेत संचालिका म्हणून काम केले असून, आता पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे जावली तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
जावली तालुक्यातून यापूर्वीच जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी विविध इच्छुकांची नावे चर्चेत असताना, महिला प्रवर्गातून सुनेत्रा ताई शिंदे यांनी अर्ज दाखल केल्याने तालुक्याला जिल्हा बँकेत आणखी एक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या कारभाराचा पूर्वानुभव असलेल्या सुनेत्रा शिंदे यांची उमेदवारी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता जावली तालुक्यातील सहकाराच्या राजकारणात महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, संस्था प्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
‘शिंदेशाही’ची पुन्हा जिल्हा बँकेत एन्ट्री होणार का? हा प्रश्न सध्या जावलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, निवडणुकीतील समीकरणे आणि संभाव्य आघाड्या याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सुनेत्रा ताई शिंदे यांच्या उमेदवारीमुळे जावली तालुक्याला जिल्हा बँकेत आणखी एक संचालक पद मिळवून देण्याचा मार्ग खुला होणार का, याचे उत्तर निवडणुकीच्या पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे.
Home Latest News Politics|Satara District माजी संचालिका सुनेत्रा ताई शिंदे यांचा महिला प्रवर्गातून जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज...






