Tuesday, September 22, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District गणेशोत्सवात खाकी वर्दीच्या सेवेला सलाम!

गणेशोत्सवात खाकी वर्दीच्या सेवेला सलाम!

33
Adv

सातारा : गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना सातारकरांच्या सुरक्षिततेसाठी खाकी वर्दीतील पोलीस बांधव मात्र कर्तव्याच्या मैदानात अहोरात्र तैनात आहेत. सलग अनेक दिवस कुटुंबीयांपासून दूर राहून बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल आणि राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या सेवेला सलाम करण्यासाठी सातारा पोलीस बॉईज व पोलीस परिवार यांच्या वतीने अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोहोचला मायेचा घास!
पोलीस मुख्यालयासह विविध ठिकाणी जवानांना फूड पॅकेटचे वाटप
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांचा उत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी पोलीस यंत्रणा दिवस-रात्र कार्यरत असते. या पार्श्वभूमीवर पोलीस बॉईजच्या वतीने सातारा शहरातील विविध बंदोबस्ताच्या ठिकाणी तसेच पोलीस मुख्यालय येथे जाऊन जवानांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. ‘तुम्ही आमच्या सुरक्षेसाठी उभे आहात, म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत’ या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून दाद दिली.
या उपक्रमाचे नियोजन किरण खरात, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. देशमुख, संतोष तावर, प्रसाद धुमाळ, किरण गायकवाड, अभिषेक गायकवाड, प्रथमेश जाधव, सार्थक शेळके, आकाश मंडले आदींनी केले. सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवाच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी केलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस बॉईजचे आभार मानले

Adv