सातारा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रतीक आबा मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतीक मोहिते यांच्या निवडीची घोषणा केली. या नव्या जबाबदारीमुळे भाजयुमोच्या संघटनात्मक कामकाजात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
प्रतीक आबा मोहिते यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्ह्यातील युवकांना संघटित करण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांच्या अपेक्षा, शिक्षण, रोजगार, व्यवसाय तसेच सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल भाजप कार्यकर्ते व युवा पदाधिकाऱ्यांकडून प्रतीक आबा मोहिते यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. “युवकांच्या विश्वासाला पात्र ठरून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Home Latest News Politics|Satara District भाजयुमोच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रतीक आबा मोहिते; शिवेंद्रसिंहराजेंची मोठी घोषणा!






