Monday, September 7, 2026
spot_img
Home Satara District Maan श्री छ उदयनराजे भोसले यांची श्री सिद्धनाथ नागरी पतसंस्थेला सदिच्छा भेट

श्री छ उदयनराजे भोसले यांची श्री सिद्धनाथ नागरी पतसंस्थेला सदिच्छा भेट

124
Adv

माणच्या सहकार क्षेत्रात आपल्या विश्वासार्ह कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुख्य कार्यालय असलेल्या दहिवडी येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. उदयनराजे यांच्या आगमनाने संस्थेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी संस्थेचे चेअरमन अरुण गोरे यांच्यासह संचालक मंडळातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संस्थेच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

दहिवडीसह माण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था सातत्याने कार्यरत आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला बळ देण्याची भूमिका संस्थेने जपली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीदरम्यान संस्थेच्या वाटचालीबाबत तसेच सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांशी संवाद झाला. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांचे योगदान आणि त्यातून सर्वसामान्यांना मिळणारा आर्थिक आधार याबाबतही यावेळी चर्चा झाली.
उदयनराजेंची भेट म्हणजे संस्थेच्या पदाधिकारी आणि सभासदांसाठी विशेष क्षण ठरला. त्यांच्या उपस्थितीने संस्थेच्या परिसरात उत्साहाची लहर पाहायला मिळाली. चेअरमन अरुण गोरे व संचालक मंडळाने संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती देत भविष्यातील वाटचालीबाबतही भूमिका मांडली.
माण तालुक्याच्या सहकार क्षेत्रात विश्वासाची नाळ अधिक मजबूत करत श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल सुरू असून, उदयनराजेंच्या सदिच्छा भेटीने या वाटचालीला निश्चितच नवी ऊर्जा मिळाली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Adv