गोडोली परिसरातील अतिक्रमणांवर अखेर सोमवारपासून कारवाईला सुरुवात होणार आहे. १० ऑगस्ट २०२६ पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असून, रस्ते, पदपथ व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा पडणार आहे.
अतिक्रमणामुळे वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांच्या गैरसोयीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पालिका प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.
गोडोलीत सोमवारपासून दिनांक १० ऑगस्ट २०२६ पासून अतिक्रमण हटाव मोहीम
पोवई नाका ते साईबाबा मंदिर तसेच गोडोली जकात नाका परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पालिकेची तयारी सातारा शहरातील गोडोली परिसरात सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. पोवई नाका ते साईबाबा मंदिर तसेच गोडोली जकात नाका परिसरात रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. तसेच पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंटच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने गोडोली चौक परिसरात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.या परिसरात शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये असल्याने नागरिकांना अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आज सातारा नगरपालिकेने पाहणी केली. त्यानंतर परिसरातील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. ही मोहीम सोमवारपासून राबविण्यात येणार आहे. तसेच परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नागरिक व व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गोडोली परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.






