Tuesday, September 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City “अतिक्रमण हटवून रुंद केलेला रस्ता पुन्हा अरुंद? ठेकेदाराच्या कामावर संताप”

“अतिक्रमण हटवून रुंद केलेला रस्ता पुन्हा अरुंद? ठेकेदाराच्या कामावर संताप”

190
Adv

सातारा : समर्थ मंदिर परिसरात सुरू असलेल्या गटर कामामध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नुकतेच पूर्ण झाल्याचे सांगितलेले गटरचे काम पुन्हा उकरून पूर्ववत (“जैसे थे”) करण्यात आल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, दुसऱ्या ठिकाणी गटरचे काम सुरू करण्याची घाई असताना समर्थ मंदिर परिसरातील चुकीच्या ठिकाणी काम केले असल्याचे निदर्शनास आले

त्यामुळे परिसरातील वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय वाढली आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, प्रशासनाने अतिक्रमण हटवून रस्ता रुंद केला होता. मात्र गटरच्या कामाच्या नियोजनाअभावी पुन्हा रस्ता अरुंद? होईल, अशा पद्धतीने काम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरच पाणी फिरल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
निकृष्ट नियोजन, वारंवार उकरकाम आणि सार्वजनिक पैशांची होणारी उधळपट्टी याबाबत आता संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Adv