Saturday, July 18, 2026
spot_img
Home Satara District सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

30
Adv

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीने सोमवार, दि. 20 जुलै, रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनाच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच नीट (NEET) प्रकरणाशी संबंधित आत्महत्या केलेल्या 30 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली. याशिवाय सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Adv