Saturday, June 27, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यावर सावकारीचा ठपका?

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यावर सावकारीचा ठपका?

272
Adv

सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा जिल्हा बँकेतील एका कर्मचाऱ्या बाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यावर सावकारीसारखे व्यवहार केल्याचा आरोप झाल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे, या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनीच साताऱ्यातील पोलीस ठाण्यात अर्ज दिल्याची चर्चा आहे.

मात्र त्यानंतर या अर्जाचे पुढे काय झाले? चौकशी झाली का? की हे प्रकरण आपापसातच मिटवण्यात आले? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, याच कर्मचाऱ्याने पुणे येथे “वेणूग्राम”च्या नावाखाली पुन्हा एका नवीन बांधकाम प्रकल्पाची तयारी सुरू केल्याची चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे बँकेतील नोकरी आणि अशा व्यावसायिक हालचाली याबाबतही विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यामुळे आता जिल्हा बँकेच्या प्रशासनासमोर काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत.संबंधित कर्मचाऱ्यावरील सावकारीच्या आरोपांची चौकशी झाली का?
पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जाचे पुढे काय झाले?प्रकरण दाबले गेले की तडजोडीत मिटवण्यात आले?बँकेच्या नियमांनुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या व्यावसायिक व्यवहारांची चौकशी होणार का?
जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे यांचे याकडे लक्ष आहे का? या सर्व चर्चांमुळे जिल्हा बँकेच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, सत्य परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी बँक प्रशासनाने अधिकृत भूमिका मांडणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

काका, अशा अधिकाऱ्यांना तालुक्यात आणि बँकेत पाठीशी घालू नका अशी खाजगीत मुख्यशाखेतील काही कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा असल्याचे बोलले जात आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे.

Adv