Monday, June 15, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी काही नगरसेवकांनी ‘लक्ष्मी दर्शन’ टाळले; पक्षनिष्ठेचा आदर्श

नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी काही नगरसेवकांनी ‘लक्ष्मी दर्शन’ टाळले; पक्षनिष्ठेचा आदर्श

64
Adv

सातारा : सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सध्या एका चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या काही नगरसेवक-नगरसेविकांनी मतदानाच्या राजकारणात ‘लक्ष्मी दर्शन’ घेतल्याची चर्चा रंगली असून, यामुळे पक्षनिष्ठा आणि राजकीय नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजकीय गलियार्‍यात अशीही चर्चा आहे की, काही नगरसेवकांनी नेत्यांच्या प्रतिष्ठेचा विचार न करता दोन्हीकडूनही ‘लक्ष्मी दर्शन’ घेतल्याने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “हेच का भाजपचे खरे निष्ठावंत?” असा सवाल आता कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, काही नगरसेवकांनी मात्र कोणत्याही प्रकारच्या ‘लक्ष्मी दर्शनाला’ नकार देत पक्षनिष्ठेला प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. निदान नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी तरी अशा प्रलोभनांना बळी न पडता स्वच्छ भूमिका घेतली असती, तर पक्ष नेतृत्वाची मान आणखी उंचावली असती, अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

‘लक्ष्मी दर्शन’मुळे चर्चेला उधाण

विधानपरिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या मतांना विशेष महत्त्व असल्याने त्यांच्यावर विविध स्तरांवरून दबाव आणि प्रलोभनांचे राजकारण सुरू असल्याची कुजबुज आहे. त्यामुळे या निवडणुकीत काही नगरसेवकांचे अक्षरशः ‘अच्छे दिन’ आल्याची उपरोधिक चर्चा रंगली आहे.

आता मतदानानंतर कोणाची निष्ठा खरी आणि कोणाचा राजकीय व्यवहार उघड होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर अनेक राजकीय चेहरे उघडे पडणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

दरम्यान, काही नगरसेवक आणि नगरसेविकांनी मात्र कोणत्याही प्रकारच्या ‘लक्ष्मी दर्शनाला’ नकार देत पक्षनिष्ठा जपल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकीकडे राजकीय व्यवहारांची चर्चा रंगली असताना दुसरीकडे निष्ठावंत नगरसेवकांच्या भूमिकेचेही कौतुक होत आहे.

काही नगरसेविकांनी दोन्हीकडूनही ‘लक्ष्मी दर्शन’ घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मतदानाच्या राजकारणात नगरसेवकांच्या मतांना मोठे महत्त्व प्राप्त झाल्याने अनेकांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे.

टीप : ‘लक्ष्मी दर्शन’ संदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून संबंधितांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Adv