Thursday, August 6, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सातारा पालिकेत विना वर्क ऑर्डर कामांचा विक्रमी घाट?

सातारा पालिकेत विना वर्क ऑर्डर कामांचा विक्रमी घाट?

311
Adv

सातारा शहरात आदर्श आचारसंहिता लागू असताना बारटक्के चौक ते बुधवार नाका परिसरात सुरू असलेल्या कामाबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. संबंधित कामासाठी वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील वाहतूक अडवून काम सुरू करण्यात आले आहे. मात्र यासाठी पोलीस विभागाची परवानगी घेण्यात आली आहे का? तसेच पालिकेची अधिकृत मंजुरी आहे का? याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
आचारसंहितेच्या काळात कोणतेही सार्वजनिक काम सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. अशा परिस्थितीत विना वर्क ऑर्डर काम सुरू असल्याच्या चर्चेमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांमधून आता काही थेट प्रश्न विचारले जात आहेत—
संबंधित कामाची वर्क ऑर्डर नेमकी कधी काढण्यात आली?
कामासाठी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी आहे का?
रस्ता अडवण्यासाठी पोलीस विभागाची परवानगी घेतली आहे का?
आदर्श आचारसंहिता लागू असताना हे काम कोणाच्या आदेशाने सुरू करण्यात आले?
जर सर्व परवानग्या आणि आदेश उपलब्ध असतील तर प्रशासनाने ते जाहीर करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा विना वर्क ऑर्डर काम सुरू असल्याच्या आरोपांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
“ना वर्क ऑर्डर, ना परवानगी; मग काम सुरू कशाच्या जोरावर?” हा प्रश्न सध्या साताऱ्यात चर्चेचा विषय ठरत असून पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Adv