सातारा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीवर खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांच्याकडूनच अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात छ उदयनराजे भोसले यांनी सध्या “बेरजेचे राजकारण” सुरू केल्याचे दिसत असून विविध गट, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यावर त्यांचा भर असल्याचे राजकीय सूत्रांकडून समजते आगामी निवडणुकीत पक्षीय तसेच स्थानिक पातळीवरील समीकरणे मजबूत करण्या साठी ही रणनीती महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले नामदार जयकुमार गोरे आ अतुल भोसले आ मनोज घोरपडे आदी मान्यवरांनी धैर्यशील कदम यांच्या उमेदवारासाठी जोरदार हट्ट धरला होता मात्र अंतिम क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या म्हणण्यानेच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले
दरम्यान खा छ उदयनराजे भोसले यांनी सर्व गटांना एकत्र ठेवत “विजयी समीकरण” तयार करण्यावर भर दिला असून मतभेदांपेक्षा समन्वयावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आगामी काळात चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या हालचालींमुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक समीकरणे अधिक सोप्पी होणार आहेत.






