Thursday, June 11, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City फ्लेक्समुक्त सातारा की फ्लेक्सयुक्त सातारा?

फ्लेक्समुक्त सातारा की फ्लेक्सयुक्त सातारा?

148
Adv

सातारा : शहराला फ्लेक्समुक्त करण्याच्या घोषणा वारंवार केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र शहरभर नव्या फ्लेक्स स्ट्रक्चर उभारणीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे “फ्लेक्समुक्त सातारा” ऐवजी “फ्लेक्सयुक्त सातारा” करण्याकडेच सातारा पालिकेची वाटचाल सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
काही वर्षांपूर्वी फ्लेक्स स्ट्रक्चर कोसळून घडलेल्या दुर्घटनांमुळे राज्यभरात प्रशासनाने खबरदारीचे आदेश दिले होते. मात्र त्या घटनांमधून सातारा पालिकेने नेमका काय धडा घेतला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शहरातील विविध चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मोठ्या स्ट्रक्चरची सुरक्षितता, परवानग्या आणि तांत्रिक तपासणी याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त होत आहेत.
पावसाळा आणि वादळी वाऱ्यांचा हंगाम सुरू असताना मोठमोठ्या फ्लेक्स स्ट्रक्चरमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाने सर्व स्ट्रक्चरची तातडीने तपासणी करून नियमबाह्य उभारणांवर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
शहर सौंदर्यीकरण, वाहतूक सुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण यांना प्राधान्य देण्याऐवजी फ्लेक्स संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोपही काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
आता प्रश्न एकच — साताऱ्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर पालिकेला जाग येणार, की त्याआधीच प्रशासन ठोस पावले उचलणार? नागरिकांचे लक्ष याकडे लागले आहे.

Adv