सातारकर यांनी विकास कामांसाठी आपल्याला निवडून दिले आहे वादावादी करण्यापेक्षा केंद्रातून व राज्य सरकारकडून कसा निधी आणता येईल यासाठी स्पर्धा करा अशा स्पष्ट सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्या
सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या वादावादी नंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही आज जलमंदिर येथे नगरसेवकांची बैठक घेतली
आमची काम होत नाहीत काम मार्गी लागत नाहीत नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन करा असाही सूर उमटत होता विकास कामांसाठी उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांनी आक्रमक भूमिका घ्यावी अशी मागणी ही काही नगरसेवकांनी घेतली
सातारकर यांनी विकास कामांसाठी आपल्याला निवडून दिले आहे वादावादी केली तर लोक विचार काय करणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो त्यामुळे एकत्र राहून कारभार करा असा सल्ला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला
सभागृहात घडलेला प्रकार आज चुकीचाच असून त्याला कुणाचेही समर्थन नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले






