Wednesday, June 17, 2026
spot_img
Home Satara District श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी घेतली जि प उपाध्यक्षांची भेट

श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी घेतली जि प उपाध्यक्षांची भेट

676
Adv

अजित पवार गटाच्या नेत्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी जिल्हा परिषदेत भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या

उपमुख्यमंत्री अजित दादांच्या समर्थक असलेल्या श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी या भाजपच्या वाटेवर असल्याच्या दोन दिवसापासून चर्चेला ऊत आला आहे उपमुख्यमंत्री अजित दादांच्या दुःखद निधनानंतर राष्ट्रवादी सोडण्याचा विचार औंध गटात कार्यकर्त्यांमधून होत असून नक्कीच श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी भाजप प्रवेश करणार की नाही हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच मात्र भाजपचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांची भेट घेतल्याने पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधान आले आहे

श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या सातारा मार्गे भाजपच्या वाटेवर असल्याचे खाजगीत बोलले जात असून तब्बल 25 वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थक म्हणून श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांची ओळख औंध गटातील काही विशिष्ट कामांसाठी त्या भाजपच्या वाटेवर असल्याचे जिल्ह्यात बोलले जात आहे

Adv