58/ 2 चा अधिकार हा नगराध्यक्ष यांना असतोच मात्र तो आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर तो वापरण्यासाठी अंमलात आणला जावा अशी तरतूद नगरपंचायत नगरपालिका अधिनियमात केली असून अशी कुठली परिस्थिती आपत्कालीन उदभवली होती की 58/ 2 चा अधिकाराचा नगराध्यक्षांना हा वापर करावा लागला असे काही जाणकारांचे मत आहे
उपनगराध्यक्ष बनकर साहेब आपण साताऱ्याचा विकास करा यात कोणाची अडकाटी येणार नाही परंतु आपल्या नेत्यांच्या मनात असणाऱ्या जुन्या इमारती न पडता त्या कशा सुस्थितीत आणण्यात येतील याकडे लक्ष दिले असेल तर बरे झाले असते ऐतिहासिक इमारती पाडून हा सातारचा विकास म्हणावा की ठेकेदारांचा हे न पडलेले कोडे असून निदान नेत्यांच्या मनाचा तरी विचार करावा अशी अपेक्षा आपल्याच पार्टीतून होत आहे
नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी साताऱ्याचा विकास करावा त्यात कोणाचीही अडकटी येणार नाही मात्र एकीकडे मिटींगला विषय घ्यायचा तिकडं ठेकेदाराला पाडायला लावायचं तब्बल नऊ लाख रुपयाचा निधी यासाठी मंजूर करावा अशी कुठली मशीन आली होती की ते नऊ लाख रुपये खर्च करून ऐतिहासिक वास्तू पाडली त्यामुळे नक्कीच ठेकेदार शाही की विकासाची गंगा हे कळायला सातारकरांनामार्ग नाही
कस्तुरबा येथील जुनी इमारत पडून तेथे कॉंकटीकरन करण्याचा घाट पालिकेने घातला आहे त्याची काही गरज नसताना काँक्रिटीकरण केले जात असून कॉंक्रिटीकरण ठेकेदारासाठी की पुन्हा तळीरामांसाठी हा प्रश्न उपस्थित होत असून त्यासाठी तब्बल नऊ लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे समजते






