Monday, May 18, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City चौका चौकात असणाऱ्या हिरव्या जाळींमागे दडलय काय

चौका चौकात असणाऱ्या हिरव्या जाळींमागे दडलय काय

49
Adv

सातारा शहरात पालिकेच्या हद्दीतच अनधिकृत टपऱ्यांच्या शेजारी हिरव्या जाळ्याच्या अडून काय उद्योग चालतात याकडे पालिका लक्ष देणार का असाच प्रश्न उपस्थित झाला आहे

जी तत्परता कस्तुरबा पाडण्यात दाखवली ती तत्परता पालिका हिरव्या जाळ्याच्या मागे काय चाललंय हे काढण्यासाठी दाखवणार का

सातारा पालिकेच्या हद्दीत अनधिकृत टप्प्यांनी ऊत आणलेला आहे या कमीकी काय म्हणून त्यांच्या शेजारीच हिरव्या जाळ्या लावून काय उद्योग चालतात याकडे पालिकेचे स्पष्ट दुर्लक्ष झाले आहे काही हिरव्या जाळीच्या आडून धुराचे लोट येतात विचित्र वास येतो सर्वसामान्य नागरिक महिला वर्ग यांना या रस्त्यावरून येणाऱ्या जाण्यावरून त्रास होत असून पालिकेने अशा हिरव्या जाळ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सातारकरांकडून होत आहे

सार्वजनिक बांधकाम विभाग ऑफिस गोडोली आरटीओ ऑफिस राधिका रोड कुबेर विनायक मंदिर स्टँड रोड मोती चौक राजवाडा चौपाटी ही प्रमुख ठिकाणी जाळ्यांनी व्यापली असून पाहिले का यावर कारवाई करणार का याकडे आता लक्ष लागले आहे

Adv